उस्मानाबाद , दि . १७ :
धाराशिव सायकल क्लब व उस्मानाबाद मॅरेथॉन सदस्यांनी उस्मानाबाद ते रायगड हा प्रवास सायकलने पूर्ण करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजधानी रायगडाला मानाचा मुजरा केला आहे.
कोरोना महामारीच्या काळात व्यायामाचे महत्व पटवून देण्यासाठी केलेला हा उपक्रम कौतुकास्पद व वाखाणण्याजोगा आहे.
अमोल माने, चित्रसेन राजेनिंबाळकर, अभिजीत पाटील, रोहन पाटील, प्रदिप खामकर, चंदन भडंगे, गिरीश अष्टगी, इंद्रजित पाटील, गणेश एकंडे (निलंगा), दीपक वळसे (अहमदपूर), नितीन तानवडे, रवी शितोळे, संजय चव्हाण, पुरुषोत्तम रुकमे, रणजित रणदिवे, आनंद देशमुख, सूरज चव्हाण यांनी श्री. कुलकर्णी, योगेश पवार, मनोज स्वामी यांच्या मदतीने हा सायकल प्रवास पूर्ण केला आहे.
त्याबद्दल आमदार कैलास पाटील यानी सायकल क्लब व उस्मानाबाद मॅरेथॉन सदस्यांचे अभिनंदन करुन साहस व धैर्याचे कौतुक केले आहे.