उमरगा ,दि . ७ : 

उमरगा तालुक्यातील  मुरूम  ग्रामीण रुग्णालयात  लस देण्यात पक्षपातपणा करून सर्वसामान्याना नाहकच त्रास देण्याऱ्या सबंधित कर्मचाऱ्याविरुध्द कारवाई करण्याची  मागणी  राष्ट्रवादी काँग्रेस युवकच्या वतीने उस्मानाबाद  जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकत्सक यांच्याकडे लेखी तक्रार  करण्यात आली आहे. 


  मुरुम येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड लस घेण्याकरिता शहर व परिसरातील लाभार्थी  नागरिक  येत आहेत‌. नागरिकांना लस घेण्यासाठी अडचण होऊ नये, यासाठी आरोग्य प्रशासनाने गर्दी झाल्यास रांग लावून लस देण्याचे नियम केले आहे. 


 रुग्णालयात संबधित कर्मचाऱ्याने सर्वसामान्यसाठीच हे नियम लागू केले आहे. नागरिकांच्या  गर्दीच्या परिस्थितीतही ग्रामीण रुग्णालयातील संबंधित  कर्मचारी आपल्या ओळखीचा  वापर करुन सर्वसामान्य लोकांना बाजूला सारत धनदांडग्यांना प्रथम लस देण्याचे काम करीत आसल्याचे आरोप केले आहे‌.  राजीकय कार्यर्त्यांनी या कर्मचाऱ्यांला फोन केले की कसलीही नोंद न घेता त्यांनी शिफारस केलेल्या  व्यक्तीना अनधिकृत लस दिले जात असल्याची चर्चा असुन  काहीं वेळेस तर स्वतः कार्यकर्ते थेट दालनात येऊन नियमबाह्यरित्या लस द्यायाला लावतात. यामुळे नियमानुसार ऑनलाइन नोंद केलेल्याना तासन् तास रांगेत  थांबलेल्या लोकांना याचा नाहक त्रास होत आहे. अशा जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या  कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फसण्यात येईल, अशा इशारा निवेदनाद्वारे  दिला आहे. 

या निवेदनावर राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव, शहराध्यक्ष बाबा कुरेशी यांच्या सह्या आहेत.
 
Top