उस्मानाबाद ,दि .०३
उस्मानाबाद जिल्हा : जिल्ह्यात रविवार दि. 01 ऑगस्ट रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. येरमाळा पो.ठा. हद्दीत महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 16 आरोपींना प्रत्येकी 500 ₹ दंडाची, निष्काळजीपने वाहन चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन करणाऱ्या एका आरोपीस 1,000 ₹ दंडाची तर कोविड मनाई आदेश झुगारुन कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण करुन भा.दं.सं. कलम- 188, 269 चे उल्लंघन करणाऱ्या 2 आरोपींस प्रत्येकी 500 ₹ दंडाची शिक्षा कळंब न्यायालयातील लोकअदालतीत सुनावण्यात आली.
तसेच लोहारा पो.ठा. हद्दीत रहदारीस धोका निर्माण करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन करणाऱ्या 2 आरोपींस प्रत्येकी 100 ₹ दंडाची शिक्षा लोहारा न्यायालयातील लोकअदालतीत सुनावण्यात आली.