नळदुर्ग ,दि .०३

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोञे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना,नळदुर्ग शहराच्या वतीने"नळदुर्ग सिटी हॉस्पिटलमध्ये" मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते.

या शिबिरासाठी डॉ.विशाल घत्तरगी, डॉ.पूजन बनसोडे हे उपस्थित होते,मनसे जिल्हाध्यक्ष .प्रशांत नवगिरे, व जिल्हा उपाध्यक्ष  महेश जाधव यांच्या हस्ते उपस्थित डॉक्टरांचा सत्कार करून शिबिरास सुरुवात करण्यात आली ,


यावेळी जिल्हा सचिव ज्योतीबा येडगे,जनहित कक्ष व विधी विभागाचे ॲड.मतीन बाडेवाले, शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,शहर संघटक रवी राठोड, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, सचिव आवेज इनामदार, उपाध्यक्ष निखिल येडगे,अमीर फुलारी,यांच्यासह हॉस्पिटलमधील सर्व नर्स,स्टाफ उपस्थित होते.
 
Top