इटकळ , दि . ०३


इटकळ ता.तुळजापूर येथील सोलापूर हैद्राबाद महामार्गालगत मोबाईल दुकान फोडून चोरट्यांनी ७२ हजाराचा सहाशे रुपयाचा माल लंपास केला.ही घटना मंगळवार   दि . ३ रोजी पहाटे आडीच ते तीनच्या दरम्यान घडली. चोरी करताना दुकानातील काॅमेराॅत ही घटना दिसत असुन ते रेकॉर्ड होताना कॅमेरा फिरवला.

तालुक्यातील तुळजापूर इटकळ येथील माने काॅम्लेस मधील आयान मोबाईल शाॅपीचे शेटर उचकटुन दुकान प्रवेश केला.दुकानातील नविन मोबाईल एलईडी , होमथेटर असा अंदाजे ७२ हजार ६०० रुपये किंमतीचा माल घेऊन चोरटे पसार झाले. चोरट्यांनी प्राथम दुकाना समोरील सिसीटीव्ह कॅमेरा तोडला. तिघानी दुकानात प्रवेश केला. दुकानातील काॅमेराॅत एकाचा उघडा चेहरा स्पष्टपणे दिसत होता.ही बाब चोरीच्या लक्षात येताच चेहरा झाकुन काॅमेरा दुसरीकडे फिरवला असल्याची घटना रेकॉर्ड झाली आहे. 

पोलीसांना माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्यातचे साहय्यक  पोलिस निरीक्षक  सुधीर मोटे, लक्ष्मण शिंदे,अतुल साळुंखे यांनी घटास्थळी भेट देवुन पहाणी केली. उस्मानाबाद येथील ठसे तंज्ञाना पाचारण करण्यात आले.

याबाबत इस्माईल नजीर शेख यांनी इटकळ पोलीस चौकीत दिलेल्या फिर्यादी नुसार नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
Top