तुळजापूर , दि . १

लिट्ल फ्लावर्स मराठी प्राथमिक शाळा तुळजापूर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .

  
लिट्ल फ्लॉवर्स मराठी प्राथमिक शाळा तुळजापूर येथे शाळेतील सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक  संजय पवार  यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले . लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी त्यांनी माहिती दिली. सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख  शिवाजी कारंडे  व श्रीमती सुनिता शिंदे  यांनी परिश्रम घेतले.
 
Top