उस्मानाबाद , दि . ३०
तुळजापूर पोलीस ठाणे : तुळजापूर- लातूर रस्त्यालगतच्या गुदामाजवळ दि. 29 जुलै रोजी 17.45 वा. शंकर दाजीराम गायकवाड, वय 26 वर्षे, रा. काक्रंबा, ता. तुळजापूर यांना तुळजापूर येथील सुरज दिपक शिंदे याने कौटुंबीक वादातून चाकूने भोकसून, वार करून ठार मारले. यावरुन काक्रंबा ग्रामस्थ- सुर्यकांत भिसे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी- सुरज हा घटनास्थळावरुन पसार झाल्याने पोलीसांनी त्याचे छायाचित्र जिल्हाभर प्रसिध्द केले होते.
दरम्यान आरोपी सुरज हा सुम्भा गाव परिसरात असल्याची गोपनिय माहिती उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पोउपनि- श्री. अनिल टोंगळे, सपोफौ- किशोर रोकडे, पोना- समाधान वाघमारे व तुळजापूर पो.ठा. च्या पोहेकॉ- सोनवने, पोकॉ- माळी, सावरे, राऊत, अमोल पवार यांच्या संयुक्त पथकास मिळाली. यावर पथकाने आज दि. 30 जुलै रोजी सुम्भा शिवारात सापळा लावून आरोपी- सुरज शिंदे यास अटक केली आहे.