उस्मानाबाद,दि.१६ 

 जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे अध्यक्षा अस्मिता शिवदास कांबळे यांच्या हस्ते  स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहन करण्यात आले. 

      
प्रारंभी अध्यक्षा अस्मिता कांबळे,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, कृषी सभापती दत्ता साळुंखे, बांधकाम सभापती दत्तात्रेय देवळकर, महिला बालकल्याण सभापती रत्नमाला टेकाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे,सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय तूबाकले यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. 


ध्वजारोहन कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील आय सी टी (माहिती व तंत्रज्ञान) पुरस्कार 2018 प्राप्त शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण घेता यावे यासाठी उमेश खोसे यांनी ऑफलाइन 51 ॲप्सची निर्मिती केलेली आहे. ध्वजारोहन कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे,कृषी विकास अधिकारी टी. जी.चीमन शेटे,बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भोसले यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
 
Top