काटी , दि . २७ :
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कुलस्वामिनी सुतमीलचे माजी संचालक व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपसरपंच कै. सुर्यभान हंगरकर यांचे 12 मे रोजी अल्पशा आजाराने दु निधन झाले. कै. सुर्यभान हंगरकर यांच्या निधनानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी काटी येथे जाऊन हंगरकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत कॉंग्रेस पक्षाचा महत्वाचा शिलेदार गमावल्याची भावना व्यक्त करीत कोरोना संसर्ग रोगाविषयी काळजी घेण्याचे सांगत हंगरकर कुटुंबियांचं सांत्वन केले.
यावेळी मुकुंद डोंगरे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर मगर,सावरगावचे सरपंच रामेश्वर तोडकरी, बाबा वडणे, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, वडगाव काटीचे सरपंच गौरीशंकर कोडगिरे, प्रा.अभिमान हंगरकर,चंद्रकांत काटे,अमोल शितोळे,नानासाहेब जानकर ,ग्रा.पं.सदस्य भैरी काळे, शिवाजी चिवरे,अनिल हंगरकर,अखिल शितोळे,सुखदेव हंगरकर,अमित हंगरकर,अजित हंगरकर,दिपक फंड,विशाल काटे,निवृत्ती गाटे, धनंजय गुरव, कृष्णा दरेकर, आबा गाटे सुर्यभान हंगरकर यांच्या भगिनी गोदन वडणे व विजया शितोळे,मुलगा अनिलसह हंगरकर कुटुंबीय तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.