नळदुर्ग , दि. ६ :

 ‍राजकीय , सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करुन  यशस्वी कारकिर्द गाजवणा-या व  प्रेरणादायी विचाराला तुळजापूर  तालुका पोरका झाला असुन दिवंगत सि.ना.आलुरे गुरुजी यांचे विचार अंगीकारावे असे श्रध्दाजली प्रसंगी बोलताना विविध मान्यवरानी व्यक्त केले.

नळदुर्ग येथे शिक्षण महर्षी,  माजी आमदार, शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर संस्थापक सचिव सि. ना. आलुरे गुरूजी यांचे   निधन झाल्याने  नळदुर्ग शहर पत्रकार संघ व मैलारपूर कट्टा मित्र मंडळाच्या वतीने  आयोजित श्रध्दांजलीच्या कार्यक्रमात  कै. सि ना आलुरे गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.


नळदुर्ग शहरातील अहिल्यादेवी होळकर चौकात शुक्रवार‍ दि. 06 ऑगस्ट रोजी दिवंगत सि.ना. आलुरे गुरूजी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी तुळजाभवानी साखर कारखाण्याचे संचालक अख्तर काझी, नळदुर्ग व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे, नगरसेवक बसवरासज धरणे, विनायक अहंकारी , माजी नगरसेवक सुधीर हजारे , शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सरदारसिंग ठाकुर, युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, शिवसेना शहर प्रमुख संतोष पुदाले, शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते बंडू कसेकर , भाजयुमोचे शहराध्यक्ष श्रमिक पोतदार, भाजपचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, मारुती खारवे, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, भगवंत सुरवसे, उत्तम बणजगोळे, दादासाहेब बनसोडे , शिवाजी नाईक, इरफान काझी, अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव समितीचे प्रभाकर घोडके, मारुती घोडके, अमर भाळे, आदिसह रणजित डुकरे, शंकर वाघमारे, रघुनाथ नागणे उपस्थित होते.
 
Top