उस्मानाबाद , दि . ६


जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दरवर्षी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो. माञ  मागिल दोन वर्षापासून हे पुरस्कार प्रलंबित असल्याने विविध गटातील हे पुरस्कार लवकर देण्याची मागणी जिल्हा क्रीडाअधिकारी यांना निवेदनाद्वारे  बेंबळी युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील यांनी मागणी  केली आहे.


उस्मानाबाद जिल्हातील युवक, युवती,आणि सामाजिक संस्था अशा तीन श्रेणीमध्ये तीन पुरस्कार दिले जातात. त्यामुळे दोन वर्षातील एकूण सहा व चालू वर्षातील तीन असे नऊ पुरस्कार प्रलंबित असून युवकांच्या क्षेञात उल्लेखनिय काम करणा-या युवकांना संघटन कौशल्य,तसेच स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, व्यसनमुक्तीचे गावोगावी प्रबोधन असे अनेक युवक सामाजिक कार्यात अग्रेसर राहून काम  सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन काम करतात. पण मागील वर्षापासून जिल्हा युवा पुरस्कार देण्याची मागणी ही ग्रामिण भागातील युवक, युवती कडूनही होत आहे. तरी जिल्हा विभागाने रखडलेला पुरस्कार तात्काळ दयावा अशी मागणी निवेदनाद्वारे मागणी महेश पाटील यांनी केली.


 
Top