तुळजापूर , दि .०२
महाराष्ट्रातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी आमदार , शिक्षणमहर्षी सिद्रमाप्पा नागप्पा आलुरे गुरुजी यांचे ९० व्या वर्षी सोमवारी पहाटे निधन झाले आहे.
सोलापूर येथे उपचारादरम्यान पहाटे साडेतीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे खूप मोठे नुकसान त्यांच्या निधनाने झाले आहे. दुपारी तीन नंतर अणदूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
1980 ते 1985 या दरम्यान आलुरे गुरुजी तुळजापूरचे आमदार म्हणून कार्यरत होते. यादरम्यान ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे संचालक होते, राज्य सहकारी बँक संचालक, सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन, बसवेश्वर शिक्षण संस्थेलातूर संचालक, बालाघाट शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष, तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना चेअरमन, तुळजाभवानी मंदिर संस्थान विश्वस्त, अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.