नळदुर्ग , दि . २३
येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वज फडकविण्यात आला. सुरुवातीला प्राचार्यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. राष्ट्रगीतासहित विद्यापीठ गीत यावेळेस म्हणण्यात आले.
प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांनी विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे, नॅक समन्वयक डॉ. मनोज झाडे, पर्यवेक्षक प्रा. नेताजी जाधव, डॉ. सुभाष राठोड, प्रा. प्रशांत अमृतराव, डॉ. विजय सावंत, डॉ. उद्धव भाले, डॉ. अशोक कांबळे, डॉ. कपिल सोनटक्के, डॉ. समिर पाटील आदिसह सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.