काटी , दि . १४ :  



भाजपा  ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर हे शनिवार दि.14 रोजी  लातूर येथील ओबीसी व्ही.जे.एन.टी‌.च्या महा मेळाव्यासाठी जात असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी,  तुळजापूर, काक्रंबा येथे भव्य स्वागत करण्यात आले. 


यावेळी तामलवाडी येथे काटी येथील भाजपचे जिल्हा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, सरपंच आदेश कोळी, मराठवाडा युवक संपर्क प्रमुख शरद पेटकर, काटीचे ग्रा,पं सदस्य बाळासाहेब भाले, मारुती रोकडे, प्रवीण माळी, राहुल गोरे, बाळासाहेब चीखलकर, प्रदिप राऊत, मोहन हागरे, नवनाथ सुरडकर, वाघमारे परीवार आणि काक्रंबा गावचे सरपंच अनिल बंडगर आदी  उपस्थित होते.
 
Top