तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथील रहिवासी अर्जुन अशोक मेलगिरी यांची सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदी तर रवी बाबुराव बनजगोळे यांची कृषी सहाय्यक पदावरून कृषी पर्यवेक्षक पदावर पदोन्नती व जगदीश बसवराज सुतार यांची पोर्ट्रेटची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मा उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे पंचायत समिती सभापती रेणूक इंगोले , पंचायत समिती सदस्य सिद्धेश्वर कोरे, सरपंच विवेकानंद मेलगिरी , उपसरपंच जयमाला करंडे , चेअरमन सिद्राम परशेट्टी, ग्रामपंचायत सदस्य सुरेश बिराजदार, ज्ञानेश्वर रेड्डी, मलप्पा पाटील , मरगु शिंदे, मालिनाथ चिंचोले, सुभाष गायकवाड, दत्तात्रय मेलगिरी, ग्रामसेवक घोगरे बी पी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.