तामलवाडी , दि.१७ :
सुरतगाव ता. तुळजापूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डोअर टू डोअर डायजेशन (मुख्य प्रवेशद्वार) या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत मीकॉन इंडस्ट्रीज लातूर व जीवन विकास संस्था उस्मानाबाद यांच्या सहकार्यातून तुळजापूर तालुक्याचे सॕनिटायझर फवारणीच्या कामास प्रारंभ करण्यात आले.
याप्रसंगी सूरतगावच्या सरपंच श्रीमती द्रोपदी गुंड , उपसरपंच बाबासाहेब गुंड ,पोलीस पाटील प्रवीण कुंभार जीवन विकास संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी जाधव यांनी सांगितले की, मंगळवार पासून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रत्येक घराचे मुख्य प्रवेशद्वार फवारले जाणार आहे. हे काम टप्प्या टप्प्याने तुळजापूर तालुक्यातील सर्व गावाचे साँनिटायझर फवारणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील, आबा गुंड, बालाजी कुलकर्णी ,महेश नकाते, बळीराम कवडे, नागनाथ गुंड ,विनोद गुंड, महादेव मगर ,कृष्णा गुंड ,बालाजी गुंड , प्रशांत माने, सचिन शिंदे हे उपस्थित होते.