नळदुर्ग , दि. १७ :
गुळहळ्ळी ता . तुळजापूर येथे कोविशिल्ड लसीचा पहिला डोस गावातील 200 पात्र व्यक्तींना सरपंच सौ मिरा सचिन घोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळहळ्ळी शिस्तबद्ध देण्यात आला.
यावेळी डॉ नरवडे , जिल्हा सरचिटणीस भाजपा युवा सचिन घोडके, ग्रामसेवक एम. सी निलगार, परिचारिका गायकवाड, उकरंडे, कुलकर्णी , मदतनीस उर्मिला धोंगडे, पवार व इतर मान्यवर उपस्थित होते .
यावेळी सरपंच घोडके यानी डॉ राहुल जानराव व आरोग्य विभाग याचे मानले आभार