लोहारा , दि .१७ : 

      
येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना उद्दिष्ट पेक्षा जास्त १४० टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आल्याबद्दल शाखा अधिकारी महेश बोंडगे यांचा सत्कार जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल्य स्वामी यांच्या हस्ते  करण्यात आला.
           

यंदाच्या खरीप हंगामात लोहारा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक च्या वतीने ११ कोटी ५८ लाख रुपये शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. यावेळी युवराज नागरे, मयुर मिसाळ, ज्योती देवकाते, दत्ता रोडगे, मनोज रोडगे, दयानंद स्वामी, आकाश आंबे, विनोद जाधव, नारायण माळी, यांच्यासह आदी उपस्थित होते



 
Top