जळकोट, दि.१६: मेघराज किलजे
गेल्या एक महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन व इतर पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे. पाऊस आज येईल उद्या येईल. या आशेवर बसलेल्या शेतकऱ्याला पावसाने पूर्णपणे हुलकावणी दिली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (नळ) या गावच्या शिवाराची निवड करून विमा कंपनी व कृषी अधिकारी यांच्याकडून पाहणी करण्यात आली. दि.१५ रोजी हंगरगा (नळ) येथे जळकोट सर्कल मधील जळकोट ते सलगरा मड्डी अंतर्गत हंगरगा( नळ )येथे बजाज अल्लियांझ जनरल इन्शुरन्स विमा कंपनीचे श्री. कोळी, पुणे विभाग , तालुका कृषी अधिकारी एन.टी. गायकवाड , तौफिक कुरेशी, उस्मनाबाद जिल्हा विमा प्रतिनिधी, महेश सुरवसे ,तुळजापूर तालुका विमा प्रतिनिधी,आर.जे. बरडे, कृषी सहाय्यक, आनंद पाटील काटी, अलमले कृषी सहाय्यक , कृषी पर्यवेक्षक डी. पी. बिराजदार , जी.एस. कांबळे , कृषी सहाय्यक, हंगरगा( नळ), गुरुदेव राठोड, रामतीर्थ यांनी हंगरगा( नळ ) येथील शिवारातील शेतकरी मकानदार इस्माईल मोहम्मद गट न.१७६, गणेश महादेव जाधव गट न.३५३, घुडुलालअमिन शेख गट न. ३१५ मधील सोयाबीन पिकाची झालेले नुकसानाची पाहणी केली. तसेच शिवारातील सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे पाऊस एक महिण्यापासून न आल्याने सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे खूप नुकसान झाले असून त्यांना नुकसानीचा मोबदला देण्यासाठी विमा कंपनीकडून व कृषी विभाग, तुळजापूर यांच्याकडून पाहणी करण्यात आली.
यावेळी सरपंच अतुल कलशेट्टी, उपसरपंच दयानंद चौगुले, ग्रामसेवक ए.जी. पाटील,तलाठी जोगदंड व शेतकरी संजय वाघोले, मोहन कांबळे, सिध्देश्वर वाघोले, गुंडेराव गायकवाड, महेबुब डाळिंबे आदि शेतकरी उपस्थित होते.