वागदरी : एस.के.गायकवाड


नळदुर्ग : येथील सुपूत्र शिलरत्न कांबळे हे भारतीय सैन दलातून सेवानिवृत्त झाल्या बद्दल वर्गमित्र ग्रूप नळदुर्गच्या वतीने त्यांचा व नळदुर्ग येथील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.


  शीलरत्न कांबळे हे भारतीय सैनदलातून तब्बल १७ वर्षे देश सेवा करून सेवानिवृत्त होवून आपल्या मूळगावी नळदुर्ग येथे आले असता दि.१५आँगस्ट स्वातंत्र्य दिनी येथील वर्गमित्र ग्रूप नळदुर्गच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. त्यांच्या राहत्या घरापासून ते कार्यक्रमाच्या ठिकाणी एस.के.फंक्शन हाँल पर्यंत वंदे मातरम, भारत माता की जय,जय जवान जय किसान आशा जयघोषात उघड्या जिपमधून मिरवणूक काढण्यात आली.

याप्रसंगी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एक मैत्रीभाव,बंधूभाव आणि देशभक्तीचा त्रिवेणी संमित्रया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने हे  होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक डॉ. सिद्रामाप्पा खजूरे हे होते.
 प्रारंभी भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन करून दिप प्रज्वलनानंतर शीलरत्न कांबळे यांचा उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.

त्याचबरोबर येथील सर्व मजी सैनिकांचाही  ग्रूपच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा उद्योजक तथा वर्ग मित्र ग्रूपचे संस्थापक सचिन धरने यांनी केले तर सुत्रसंचलन भैरवनाथ कानडे यांनी केले व आभार  धनंजय डुकरे यांनी केले.
   

यावेळी नगरसेवक दयानंद बनसोडे, दुर्वास बनसोडे सामाजिक कार्यकर्ते मारूती खारवे,वर्गमित्र ग्रूपचे समीर सुरवसे, गौरीशंकर ,कोरे,शीलवंत मुळे, आविनाश महाबोले,धनंजय डुकरे, तुकाराम घोडके,संदिप गायकवाड सह मित्र परिवार नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
 
Top