मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भवानी मातेचे मंदिर तात्काळ उघडावे - तुळजाभवानी पुजारी मंडळाची मागणी

तुळजापूर,  दि.  १७

श्री  तुळजाभवानी मंदिर भाविकांना खुले करण्यात यावे, या मागणीसाठी श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषणास आमदार राणा जगजितसिंह पाटील व माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी पुजारी मंडळाच्या मागणीला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

तुळजा भवानी मंदिर महाद्वार समोर मंगळवारी   मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी जि. प. अध्यक्ष धीरज पाटील,  नागेश साळुंखे, नागनाथ भांजी, लालासाहेब मगर, नरेश अमृतराव, सुनील रोचकरी, नरसिंग भोसले, अजित क्षीरसागर, मनोज अनिल रोजकरी , सुहास साळुंखे ,शांताराम पेंदे, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, श्रीराम अपसिंगेकर, मकरंद प्रयाग, पुजारी बाळासाहेब  शामराज, जीवन राजू इंगळे ,गुलचंद व्यवहारे ,अर्जुनप्पा साळुंके, संदीप गंगणे, धीरज जाधव, श्रीकांत नाडापुडे, अनंत बुरांडे, बाळासाहेब शिंदे, मधुकर शेळके आदी पुजारी , व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी  मंत्री मधुकरराव चव्हाण व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सुमारे एक तास वेगवेगळ्या वेळी उपोषणामध्ये सहभाग नोंदवून आपला भक्कम पाठिंबा  असल्याचे सांगितले.

तुळजापूर शहर संपूर्ण तुळजाभवानी मंदिरावर अवलंबून आहे. मागील पावणे दोन वर्षापासून पुजारी आणि व्यापारी खूप मोठ्या अडचणीत असून जिल्हाधिकारी आणि विश्वस्त यांनी मंदिर उघडण्याच्या संदर्भातील महत्त्वाचा प्रस्ताव तयार करून तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करावा आणि मंजुरी द्यावी अशी मागणी या निमित्ताने  मधुकरराव चव्हाण यांनी  सांगुन आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार , प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी देखील असल्याचे सांगितले. दरम्यान यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आपण विश्वास मंडळांमध्ये या विषयी चर्चा करून लवकरात लवकर मंदीर उघडण्याची कार्यवाही करू या संदर्भाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करू असे सांगून सदर उपोषणास आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. 

उपोषणामध्ये पुजारी बाळासाहेब श्यामराज यांनी मंदिर प्रशासन आणि विश्वस्त तसेच राज्य सरकार यांच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. वास्तविक परिस्थितीचे आकलन न करता गोरगरीब पुजारी वर्ग आणि व्यापारी वर्गाला वेठीस  धरले आहे, लोकप्रतिनिधींनी आपले कर्तव्य अगोदर पार पाडले पाहिजे, मात्र याचा तुळजापुरात विसर होतो आहे, अशी टीका केली. 


याप्रसंगी लालासाहेब मगर,  नगरसेवक अमर मगर, जीवनराजे इंगळे ,धीरज जाधव, मधुकर शेळके , संदीप गंगणे, भांजी, श्रीकांत नागापुरे यांच्यासह इतर पुजारी व व्यापारी यांनी भाषणे केली. विनोद गंगणे, बापूसाहेब कने, यांच्यासह इतर नगरसेवक आणि माजी नगरसेवक यांनी उपोषणास भेट दिली.
 
Top