मुरूम, दि . ३ : 

येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एन.एम.एम.एस. घेतलेल्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. यावेळी मुख्याध्यापक बालाजी गाडेकर यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थिनी कुमारी राणी किरण जाधव, पार्वती सुरेश वडतीले या दोघीनींही समान गुण मिळवून प्रशालेतून प्रथम येण्याचा मान मिळविल्याबद्ल त्यांचा सत्कार सोमवारी  रोजी प्रशालेत करण्यात आला. 


यावेळी मुख्याध्यापिका बिना पोतदार, अलका गायकवाड, शरयु पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. शालेयस्तरावर विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेविषयी आवड निर्माण होऊन तयारी होणे, ही काळाची गरज आहे. या विद्यार्थ्यांसोबत इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यादृष्टीने इयत्ता ८ वी च्या वर्गशिक्षिका डॉ. वंदना जाधव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. 

यावेळी मंकावती कांबळे, अरुणा दुगम, नूरमहमद घाटवाले, रुपचंद ख्याडे यांचेही सहकार्य लाभले. 


 
Top