.    तामलवाडी,  दि.०१  


येथील सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय तामलवाडी ता . तुळजापूर या शाळेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी  करण्यात आली .


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्र्यंबकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ तामलवाडी चे अध्यक्ष  बसवण्णाप्पा चंद्रकांत मसुते , प्राचार्य सुभाष जाधव व  पर्यवेक्षक गणेश हलकरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले .  तर सामाजिक अंतर ठेवून महादेव मसूते यांनी लोकमान्य टिळक व चांगदेव सावळे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्र सांगून  सविस्तर माहिती दिली  व   यावेळी ज्येष्ठ शिक्षक औदुंबर माडजे ,चंद्रकांत साळुंखे , चांगदेव  सावळे, प्रभाकर जाधव ,शिवकुमार सिताफळे, सुहास वडणे  ,महादेव मसुते,  महादेव माळी , विनोद कुंभार , प्रशांत चुंगे , बालाजी साठे ,लक्ष्मण पाटील, गिरीश जाधव ,योगेश राऊत, श्री गणेश स्वामी ,बालाजी रणसुरे, दत्तू कोकरे ,सुनील पाटील, महिला शिक्षिका शाहिदा पिरजादे , मनिषा गिरे, मनीषा सावंत विठाबाई पाटील तसेच  शिक्षक प्रभाकर जाधव यांनी सूत्रसंचालन केले या कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 
Top