उस्मानाबाद , दि .०१
नळदुर्ग येथील राष्ट्र सेवा दल संचलित ‘आपले घर’ प्रकल्पातील वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचे आज्ञाताने अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
तौफीक शफीक नट , वय 13 वर्षे असे अपहरण झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. नट हा (आलियाबाद) नळदुर्ग ता. तुळजापूर येथील धरित्री विद्यालयात दि. 30 जुलै रोजी 12.30 वा. शाळेच्या मधल्या सुट्टीतून बेपत्ता झाल्याने कोण्या अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्याचे अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या वस्तीगृह प्रशासन कर्मचारी- संदीप चवले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.