उस्मानाबाद , दि .०१ : एस.के.गायकवाड
विद्यार्थी आणि पालक यांच्याशी योग्य समन्वय साधून विद्यार्थी प्रिय ,पालक प्रिय शिक्षक होणे हे फार मोठे कठीण काम असून प्रा.डी.डी मस्के यांनी सर्वाशी चांगले हितसंबंध जोपासत विद्यार्थी प्रिय एक आदर्श शिक्षक म्हणून जनता उच्च माध्यमिक विद्यालय येडशी येथून सेवा निवृत्त होत आहेत. ही एक आभिनंदनीय बाब असल्याचे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे अध्यक्ष डॉ. बी.वाय.यादव यांनी बोलताना सांगितले .
उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी येथे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित जनता उच्च माध्यमिक विद्यालय येडशी येथे प्रा.डी.डी.मस्के यांचा सेवानिवृत्त समारंभ संपन्न झाला.
यावेळी डॉ.बी.वाय.यादव
कार्यक्रमच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून दर्जेदार (टाँप) शिक्षण ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माढा विधानसभा मतदार संघातील माजी आमदार धनाजीराव साठे, कामगार नेते काँ.प्रा.तानाजी ठोंबरे, माजी जि.प.अध्यक्ष शिवदास कांबळे, जिल्हा ग्राहक न्यायालयाचे सदस्य मुकुंद सस्ते आदी उपस्थित होते.
प्रारंभी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज,कर्मवीर कै.डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पूजन करून व दिप प्रज्वलन करून प्रा.डी.डी.मस्के यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या एम.एल.इटेवाड यांनी केले तर सुत्रसंचलन वाय.एस.उपळकर यांनी केले व आभार दोरकर यांनी तर एस.एल.तांबे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी नंदनजी जगदाळे, पी.टी.पाटील, अरूण देबडवार,जयकुमार शितोळे, व्ही.एस.पाटील, डी.एस.रेवडकर ,अँड. बाबासाहेब गायकवाड, धनंजय आप्पा पाटील प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे, प्राचार्य डॉ. टी.एस.मोरे, युवा नेते गजानन नलावडे सह शिक्षक,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी नातेवाईक, ग्रामस्थ उपस्थित होते.