तुळजापूर दि . १३ 

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन श्री तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग महाराष्ट्र शासनाचा हस्तांतरित करण्याची मागणी विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली.

विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि तुळजापूर येथील शैक्षणिक प्रश्नाबाबत त्यांना निवेदन दिले . शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या शुल्कात १५ %कपात केले असून तसेच उच्च शिक्षण अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क १५ %माफ करण्यात यावे त्याच धर्तीवर उच्च शिक्षण अंतर्गत येणाऱ्या पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क १५ %माफ करण्याचा तात्काळ निर्णय घ्यावा व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आली.

यावेळी उपस्थित  खासदार ओमराजे  निंबाळकर, आमदार कैलास  पाटील, मराठवाडा शिक्षक सेनेचे अध्यक्ष डॉ. गोविंद काळे, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले, तालुका शहर प्रमुख विद्यार्थी सेना च ऋषिकेश इंगळे, सत्यजित सोनवणे, कृष्णा चव्हाण हे उपस्थित होते.
 
Top