तुळजापूर, दि .१३ :
मराठवाड्यासह उस्मानाबाद जिल्हातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांचे शासकीय शुल्कामध्ये तांत्रिक शिक्षणाची सोय होऊन या भागाचा शैक्षणिक व आर्थिक विकास व्हावा, या अनुषंगाने सदरील महाविद्यालय शासनाने अधिग्रहित करावे, यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
श्री तुळजाभवानी महाविद्यालय हे तुळजाभवानी मंदीर संस्थानचा शैक्षणिक उपक्रम असल्याने अशा प्रकारच्या खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे विद्यार्थांचा कल कमी झाला असुन कर्मचार्यांचे मासिक वेतन देखील प्रलंबीत राहते. त्यामुळे सदरील महाविद्यालय शासनास हस्तांतरीत करावे अशी मागणी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले उपस्थित होते.