नळदुर्ग , दि .१३
वाचन सांस्कृती टिकविण्यासाठी , लोप पावत चाललेल्या वाचनाची आवड युवा पिढीत रुजविण्याकरिता, वाढदिवसाचे औचित्य साधुन मुळे कुटूंबियाकडुन वाचनालयास तब्बल लाखाची पुस्तके भेट दिल्याने सर्वञ या उपक्रमाबद्दल कौतुक केले जात आहे .
उस्मानाबाद तालुक्यातील तेर गावातील रहिवासी असलेले रचना कन्स्ट्रक्शन आणि कंपनी लिमिटेडचे चेअरमन दत्तात्रय मुळे यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त खुदावाडी ता. तुळजापूर येथिल शेतकरी वाचनालयास एक लाख रुपये किंमतीचे विविध पुस्के भेट देण्यात आली.
सुजित मुळे यानी खुदावाडी येथे भेट देवुन पाहणी केली. शेतकरी वाचनालयाची पाहणी केली असता त्यांना ग्रामीण भागात सुंदर वाचनालय आहे. हे पाहून त्यांनी वाचनालयालयास पुस्तक भेट देण्याचा निर्णय घेतला. या वाचनालयाची स्थापना 1975 सली करण्यात आली. या वाचनालयाचे प्रमुख प्रेरणास्थान , मार्गदर्शक कै. तुकाराम नरवडे , डॉ. सिद्रमाप्पा खजूरे , बब्रुवान नरवडे, वसंत चिंचोले , वसंत सालगे यांच्या मार्गदर्शनाखाली या वाचनालयाची निर्मिती झाली.
आजतागायत हे वाचनालय चांगल्या पद्धतीने चालू असुन शंभर पुस्तका पासून सुरुवात झालेले हे वाचनालय आज 13 हजार पेक्षा आधिक पुस्तके वाचनालयात आहेत. व काही मासिक ,साप्ताहिक , वृत्तपत्र, आहेत.
मोबाइलच्या दुनियेत वाचनाची आवड लोकांमधून कमी होत आहे ती वाचनाची आवड लोकांमध्ये वाढावी यासाठी रचना कंस्ट्रक्शन लिमिटेड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सुजित मुळे यांनी त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खुदावाडी वाचनालयास एक लाखाची पुस्तके भेट दिली आहे.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ समाजसेवक डॉ सिद्रामप्पा खजुरे यांनी केले. यावेळी अमोल नरवडे, उपसरपंच पांडुरंग बोगरगे, मा. सरपंच रेवणसिद्ध स्वामी, मा.सरपंच गुरुनाथ कबाडे, मा.उपसरपंच अमर नरवडे ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक वसंत कबाडे, शेतकरी वाचनालयचे सचिव वसंत चिंचोले, राम जवळगे,शाम जवळगे,अभियंता वैजनाथ बसूदे , महेश व्हरकटे, योगेश हांजगे, रोहित पवार , युवा मंचचे तालुकाध्यक्ष नरवडे श्रीधर, अविनाश नरवडे, मोहन नरवडे ,अनंत नरवडे देविदास बोंगरगे यावेळी उपस्थित होते.