काटी , दि .२० : 


तुळजापूर तालुक्यातील काटी तांडा ते नृसिंह तांडा या २ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी ०१.५३ रू. कोटी निधी प्राप्त झाला आहे. तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतरस्त्याच्या कामासाठी १९ लक्ष रु. खर्च करण्यात येणार आहे.

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत काटी तांडा येथे सिमेंट काँक्रीट रस्ता (०६ लक्ष रु.) व खुंटेवाडी तांडा येथेही सिमेंट काँक्रीट रस्त्याचे (०३ लक्ष रु.) काम पूर्ण होणार आहे. या योजनेतून तालुक्यातील तांड्यांवर दर्जेदार रस्ता असावा यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
 
Top