.


सावरगाव येथे रेशनकार्ड संदर्भात शिबिर संपन्न ; उत्कृष्ट कार्याबद्दल तहसीलदार तांदळे यांचा सत्कार 

काटी , दि. २०

 तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे रविवार दि. 20 रोजी सकाळी दहा वाजता दिशा समितीचे अध्यक्ष खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सुचनेनुसार महसूलच्या पुरवठा विभागाच्या वतीने तहसीलदार सौदागर तांदळे, पुरवठा निरीक्षक तथा नायब तहसीलदार संदीप जाधव यांच्या उपस्थितीत सावरगाव कृषी मंडळाअंतर्गत येणाऱ्या गावांसाठी येथील सावरगाव ग्रामपंचायत कार्यालयात रेशनकार्ड संदर्भात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
या शिबिरात रेशनकार्ड संदर्भात समस्या असलेल्या कुटुंबीयांनी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करुन नागरिकांनी या शिबिराच्या माध्यमातून समस्या सोडविल्या  आहेत. अनेकदा रेशनकार्ड संदर्भात नागरिकांना प्रशासकीय कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागतात. कागदपत्रांची पूर्तता नसल्याने व अपुरी माहितीमुळे अनेक कुटुंबाचे रेशनकार्ड दुरुस्त होत नाही. तालुका स्तरावर या याबाबत अर्ज प्रलंबित राहत असल्याने दिशा समितीचे अध्यक्ष खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याअनुषंगाने जिल्हाभर रेशनकार्ड संदर्भात शिबिराचे आयोजन करण्यात येत असून त्याअनुषंगाने सावरगाव  ग्रामपंचायत कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 
नागरिकांच्या रेशनकार्ड
संदर्भातील अडचणी जाणून घेऊन त्या रेशनकार्ड शिबिरामार्फत  फाटलेले रेशनकार्ड नवीन देणे, पत्ता बदल करणे, हरवलेले रेशनकार्ड नवीन करणे, रेशनकार्ड विभक्त करणे, रेशनकार्ड मध्ये नाव वाढविणे, कमी करणे आदी समस्या सोडविण्यात आल्या.
*तहसीलदार तांदळे यांचा सत्कार*
 तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांचा नुकताच पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते कोरोना योध्दा व उत्कृष्ट तहसीलदार हा बहुमान मिळविल्याबद्दल सावरगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच रामेश्वर तोडकरी, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख प्रदीप मगर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
         यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, पुरवठा अधिकारी तथा नायब तहसीलदार संदीप जाधव, सरपंच रामेश्वर तोडकरी, पोलीस पाटील समाधान डोके, संजय कोळी,काटी सज्जाचे तलाठी प्रशांत गुळवे, सावरगावचे अंधारे, सुरतगावचे सुर्यवंशी, राजमाने मॅडम, काशिद, काळे, महसूल विभागातील जी.एस. पवार, पी.जी.कानडे, सुरेश वाघमारे, औदुंबर गिरी, बाळु सोनवणे, अंकुश जाधव, परमेश्वर बोबडे, विलास गुंड, मंजुर मुजावर आदी मान्यवर सहभागी होते.

 
Top