तामलवाडी, दि . 13 :
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय कन्या शाळा येथे इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व जिल्हा परिषद प्रशाला काटी येथे इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पार पडली.
या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा करीता 120 विद्यार्थ्यांपैकी 113 विद्यार्थी उपस्थित होते. तर केंद्र संचालक विलास काशीद या शाळेचे मुख्याध्यापक तानाजी शेळके परिवेक्षक पर्यवेक्षक चंद्रकांत साळुंखे औदुंबर माडजे ,चांगदेव सावळे, प्रभाकर जाधव ,लक्ष्मण पाटील, महादेव माळी यांनी चोख काम बजावले.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा करता एकशे दहा विद्यार्थ्यांपैकी 105 विद्यार्थी उपस्थित होते. या परीक्षेसाठी केंद्रसंचालक पोपट गोरसे तर पर्यवेक्षक म्हणून ब्रह्मदेव शितोळे ,विनोद पवार ,अब्दुल शेख ,जब्बार शेख ,प्रभाकर चव्हाण यांनी काम पाहिले तर बैठे पथकासाठी गटशिक्षण कार्यालय तुळजापूरचे विजय देशमुख व मनोज वाकडे यांनी काम पाहिले व परीक्षा तामलवाडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस पोलिस बंदोबस्तात पार पडली.