उमरगा , दि. १३
कोरोनाच्या संकट काळामध्ये कुटुंबाचा आधार गमावलेल्या महिलांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 आणि रोटरी क्लब उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने शिलाई मशीन देऊन कुटुंब उभारण्यास घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब उमरगा च्या महिला सबलीकरण संचालक डॉक्टर शशी कानडे यांनी केले.
उमरगा येथील दत्त मंदिर परिसर येथे उमरगा तालुक्यातील गरजू निराधार महिलांना 12 महिलांना शिलाई मशीन वाटप रोटरीचे माजी गव्हर्नर डॉक्टर दीपक पोपळे, रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा कविता अस्वले, माजी सचिव अनिल मदनसुरे, क्लबचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर पंडित बुटूकने, सचिव व्यंकट गुंजोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
रोटरी क्लब उमरगाच्या वतीने 2020-21 या वर्षामध्ये उमरगा तालुक्यातील बचत गट असो अथवा कोरोना संकट काळात निराधार झालेल्या महिला असो त्याना मदतीचा हात देताना 20 शिलाई मशीन आतापर्यंत देण्यात आली आहे असे प्रतिपादन क्लबचे ट्रेनर डॉ. संजय अस्वले यांनी केले.
यावेळी रोटरीचे हरिप्रसाद चांडक, पी एस पाटील, माजी अध्यक्ष शिवानंद दळगडे, नितीन होळे, प्रवीण स्वामी, अजित गोबारे, रणजीत बिराजदार, संतराम मुरजानी, संजय ढोणे, पप्पू स्वामी, सतीश साळुंके, उमेश चिंचोळे, गोविंद हराळकर, विकी चव्हाण मुन्ना पाटील, अमर परळकर, डॉ. सुचिता पोपळे ,मनीषा गुंजोटे, सविता दळवी, रोटरी किल्लारी सॅटेलाईट क्लबचे प्रमोद बिराजदार, आदींची उपस्थिती होती.
दत्त मंदिर समितीचे प्रवीण कोराळे, सुनील पांचाळ, शाहू बिरादार, गिरीश कडगंचे, संतोष कडगंचे, अशोक टेकाळे, बालाजी शिंदे, बालाजी बोकडे, रवी आगडे आदींची उपस्थिती होती. यावेळी जिजाऊ रोटरी क्लबच्या अध्यक्षा अंजली चव्हाण आणि पोद्दार लर्न स्कूल इंटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षा सोहा मुल्ला आणि सचिव सर्वेश दळवी यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव गुंजोटे आणि आभार अनिलल मदनसुरे यांनी केले.