चौसाळा ,दि .१३ :  गणेश गिराम

   विदर्भाची पंढरी गजानन महाराज संस्थान शेगावची कीर्ती भारतच नव्हे तर जगभर पसरलेली आहे आणि संस्थांचे नाव सातासमुद्रापार नेण्याच्या मागे संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांचे फार मोठे मोलाचे योगदान आहे.  गेल्या चार ऑगस्ट रोजी कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांची प्राणज्योत मालवली आणि गजानन महाराजच्या सर्व भक्तगण परिवारावर दुःखाची फार मोठी शोककळा पसरली. कारण भक्तांची श्रद्धा जेवढी गजानन महाराजांनवर आहे. अगदी तेवढीच श्रद्धा सर्व भक्तांची कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्यावर ही आहेच.

     
कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील हे ज्या दिवसाला अनंतात विलीन झाले त्या दिवसाला शेगाव मध्ये गर्दी होऊ नये म्हणून पाटील कुटुंबीयांनी भक्तांना आवाहन केले कुणीही शेगावला येऊ नये म्हणून सर्व भक्तगण मंडळी आपल्या ठिकाणीच भाऊंच्या आठवणीत अश्रू ढाळत बसले आणि येत्या 16 ऑगस्ट रोजी भाऊंचा शुद्ध क्रियेचा कार्यक्रम आहे. त्यावेळी सुद्धा भक्तांना शेगावमध्ये जाता येणार नाही, आणि म्हणून आपल्या ठिकाणावरूनच कर्मयोगी पाटील यांना आपल्याला श्रद्धांजली अर्पण करायची आहे. त्याकरिता आम्ही गजानन महाराज भक्तगण मंडळ व विश्व वारकरी सेनेच्या वतीने विचार हा केला की शेगावचे देवस्थान सोन्या, चांदीच्या मूर्ती करीता प्रसिद्ध नसून स्वच्छता, व्यवहार पारदर्शकता, वैद्यकीय सेवा,पवित्रता ,अन्नदान आणि बर्‍याच सामाजिक उपक्रमांमधून ओळखले जाते. म्हणून कर्मयोगी  पाटील यांना श्रद्धांजली सुद्धा सामाजिक उपक्रमातून राबवली गेली पाहिजे. या उद्देशाने आम्ही गजानन महाराज भक्त परिवार व विश्व वारकरी सेनेच्या वतीने 16 ऑगस्ट तारखेला आपल्या घरी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या फोटो नसल्यास गजानन महाराजांचा फोटो ठेवून पुरणपोळी सह पंचपक्वान्नांचा नैवेद्य अर्पण करणार व शिवशंकरभाऊ पाटील यांच्या आठवणी मध्ये एक झाड लावून हे झाड जगवण्याची जबाबदारी स्वीकारणार ज्यावेळेला आम्ही त्या वृक्षाला पाणी घालू त्यावेळेला आम्हाला त्या वृक्षांमध्ये शिवशंकरभाऊ पाटील दिसतील अशी आमची धारणा आहे. आणि हा उपक्रम श्रींचे सर्व भक्त आपल्या घरीच व राबवणार आहे.

 या उपक्रमात अरुण महाराज बुरघाटे, महादेव महाराज इंगोले आळंदि, तुकाराम महाराज भोसले पंढरपुर,नाना महाराज पाटिल, लोंढे महाराज, बडे महाराज,आवारे महाराज मुंबई ,केशवदास महाराज वैष्णव बीड,पवार महाराज अहमद नगर,माऊली महाराज सुरळकर औरंगाबाद, संतोष महाराज वाघोडकरजळगाव खान्देश,गजानन महाराज दहिकर, कृष्णा महाराज पाटील बुलढाणा, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर पुणे, विलास महाराज फापाळे ठाणे,ज्ञानेश्वर महाराज जावरकर अकोला, सोपान महाराज,विठ्ठल  चौधरी अमरावती, प्रकाश महाराज खंडार वर्धा, गुल्हाने महाराज यवतमाळ, भरत महाराज सांगली,प्रकाश म पाटील रायगड,टेकेश्वर महाराज नागपूर, केदारनाथ महाराज सरानाईक वाषीम , भास्कर महाराज टेकाळे ,रहाणे महाराज नामानंद महाराज ,भांडे महाराज नाशिक यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे अशी माहिती विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांच्या वतीने देण्यात आली.
 
Top