नळदुर्ग , दि . १३


बालाघाट शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विज्ञान शाखेत तृतीय वर्षात शिकत असलेला विक्रम माणिक राठोड यांना महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुक्रवार दि. 13 ऑगस्ट रोजी " कोविड योद्धा " पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

उस्मानाबाद येथिल विद्यापिठ उपपरिसर येथे शुक्रवार रोजी
 नळदुर्ग येथिल  कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा  विद्यार्थी  विक्रम माणिक राठोड यांची आदर्श स्वयंसेवक म्हणून   उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना .उदय सामंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आले. 

यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर , आमदार कैलाश पाटील ,कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर,  प्रा. डॉ. नीलेश शेरे, प्रा. महेंद्र भालेराव, माणिक राठोड  आदीची  उपस्थित होती .

विक्रम राठोड यास आदर्श स्वयंसेवक म्हणुन गौरव झाल्याबद्दल  तुळजापूर लाईव्हचे संपादक शिवाजी   नाईक , संरपच   दामाजी राठोड ,  राष्ट्रीय सेवा योजना संचालक टि. आर. पाटील, मकरंद चौधरी , किसन ओव्हाळ , अरुण नाईक  , युवराज जाधवर  , आभिजित राठोड , आजित राठोड आदीनी आभिनंदन केले . 


 
Top