शहर शिवसेनेच्या वतीने कमलाकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द बोलल्यामुळे नळदुर्ग शहर शिवसेनेच्या वतीने नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे लालबहादूर शास्त्री चौक ते राष्ट्रीय महामार्ग अंत्ययाञा काढुन पुतळ्याला जोडे मारून पुतळा दहन केले.
या आंदोलनामध्ये कमलाकर चव्हाण , उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर , शहरप्रमुख संतोष पुदाले, सुनील कदम यांनी तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
यावेळी ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख राजेंद्र जाधव, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख नेताजी महाबोले, उपशहरप्रमुख सोमनाथ म्हेत्रे, युवासेना शहरप्रमुख मयुर हुलगे, भिमा कोळी, खंडु माने, टिल्लु कांबळे, चंदर सगरे, विश्वजित कांबळे,ओंकार कल्लशेटी,आण्णा पकोळी, अक्षय कोळी, किसन मुळे या आंदोलनामध्ये सहभागी होते.