नळदुर्ग, दि. २४ :
महिन्याभरात नळदुर्ग येथील उपजिल्हारुग्णालय पुर्ण क्षमतेने कार्यान्वित न झाल्यास अमरण उपोषण करण्याचा इशारा काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिले.
मंगळवार दि. 24 ऑगस्ट रोजी नळदुर्ग शहर काँग्रेस कमिटिच्या वतीने अनेक वर्षापासून येथील रखडत पडलेल्या उपजिल्हा ग्रामिण रुग्णालय सुरू करावे या मागणीसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
नळदुर्ग पोलिस ठाण्याअंतर्गत वाडी, वस्ती, गावे असे 91 गावांचा समावेश आहे. नळदुर्ग शहराची व परिसरातील गावांची लोकसंख्या विचारात घेता व कोरोनासह अनेक साथीच्या रोगांचे प्रादुर्भाव पाहाता त्वरित उपजिल्हा रुग्णालय सुरू होणे गरजेचे आहे. त्याकरिता काँग्रेस पक्षाच्यावतीने रुग्णालय सुरू करावे या करिता लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
या उपोषणादरम्यान माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी भेट दिली, यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे युवा नेते सुनिल चव्हाण भेट देवुन चर्चा केली. उपोषणात काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज काझी, नगरसेवक बसवराज धरणे, शहबाज काझी, व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे, पांडु पुदाले, माजी नगरसेवक सुधीर हजारे, इमाम शेख, मंदार पुदाले, संदिप गायकवाड, सुधिर पुराणीक, फारुक कुरेशी, समिर सुरवसे, शेख शरिफ, कल्पना गायकवाड, निर्मला काळे, सुनिता सावंत, मिना जगताप, अनिता रणे, कोंडाबाई गायकवाड, कांताबाई जगताप, सुभद्रा मुळे, माजी नगराध्यक्षा झिमाबाई राठोड, सुकमार किल्लेदार, शिवाजी गायकवाड, स्वप्निल डुकरे, रामकृष्ण लांमजणे, शिलरत्न कांबळे, सचिन बेडगे, सतिश पुदाले, अझर जहागिरदार, आदिजण सहभागी होते.
उपोषण स्थळी तहसिलदार सौदागर तांदळे यानी भेट दिली. दरम्यान तांदळे यानी जिल्हाधिकारी याना या आंदोलनाची माहिती फोनवरुन दिली. उपोषणकर्त्याशी चर्चा करण्यात आली.लवकरच रुगणालयाचे दोन विग्ज सुरु करण्याबाबत लेखी दिल्याने उपोषण मागे घेतले.