तुळजापूर , दि .२४: 

 गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने राज्याच्या अनेक भागात पुराने थैमान घातले होते. पुराच्या पाण्यात नागरिकांचे संसार वाहून गेल्याने उघड्यावर आलेल्या पूरग्रस्तांसाठी श्री  तुळजाभवानी मंदिर संस्थानने २५ हजार साड्यांची मदत पाठवली आहे. 

पूरग्रस्तांसाठी साड्या घेऊन दोन ट्रक सोमवार दि. २३ सायंकाळी रवाना करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा पूरग्रस्तांना मदतीच्या सुचने नंतर मंदिर संस्थानने तातडीने  ठराव घेत पूरग्रस्तांसाठी मदतीचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी सायंकाळी दोन ट्रक  मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे ह्यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, संकेत वाघे, मार्तंड दिक्षीत यांचासह मंदिर संस्थानचे अधिकारी,  कर्मचारी उपस्थित होते. 

 
Top