अणदुर, दि. २५ :  तुळजापुर तालुक्यातील अणदुर येथील प्रविण घुगे यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली आहे. सदरील निवड ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

प्रवीण घुगे यांच्या या निवडी बद्दल अणदुर येथे फटाके फोडुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अक्षय अनिल घुगे , अभिजित घुगे, सौरभ घुगे, सार्थक मोहराळे अजिक्यं घुगे आदी उपस्थित होते.



 
Top