उस्मानाबाद , दि .२५ : 


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्यावतीने विभागीय केंद्राच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जिल्ह्यात उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्तीस व संस्थेस प्रत्येक वर्षी यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे प्रायोजकत्व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्याकडे असणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या विभागीय केंद्राच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जिल्ह्यांमध्ये उल्लेखनिय काम करणार्‍या कर्तृत्ववान व्यक्तीस किंवा संस्थेस प्रत्येक वर्षी यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. 


कृषी, औद्योगिक समाज रचना व व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान व तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य, संस्कृती, कला व क्रिडा यासाठी उल्लेखनीय काम करणार्‍या उस्मानाबाद जिल्ह्यातील व्यक्तीस व संस्थेस प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राच्यावतीने प्रत्येक वर्षी  यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी पात्रता विभागीय क्षेत्रात समाजपयोगी उल्लेखनीय काम करणार्‍या कर्तृत्ववान एका व्यक्तीची अगर संस्थेची निवड करुन रु. 15,000/- चा यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार व सन्मानपत्र देण्यात येईल., संस्था या संज्ञेखाली महाराष्ट्रातील सार्वजनिक विश्वस्त संस्था नोंदणी अधिनियम, सहकारी कायदा वा कंपनी कायद्याखाली नोंदणी झालेल्या ना नफा ना तोटा या संज्ञेखाली स्थापन झालेल्या कंपन्या यांचा समावेश होईल., ज्या क्षेत्रातील गौरव पुरस्कारासाठी  प्रस्ताव करण्यात आला असेल, त्या क्षेत्रातील निदान सलग 5 वर्षाच्या कामाचा विचार निवड मंडळ करील., निवड मंडळाने एकमताने वा बहुमताने निवडलेल्या व्यक्तिस अगर संस्थेस गौरव पुरस्कार व स्मृतिचिन्ह दिले जाईल., निवड मंडळास एखाद्या वर्षी संबंधीत क्षेत्रात योग्य व्यक्ती अगर संस्था गौरव पुरस्कारास पात्र वाटली नाही तर त्यावर्षी गौरव पुरस्कार दिला जाणार नाही., निवड झालेल्या गौरव पुरस्कार पात्र व्यक्तीस अगर संस्थेस पुन्हा पाच वर्षापर्यंत त्याच क्षेत्रातील कामाच्या गौरव पुरस्कारासाठी विचारात घेतले जाणार नाही., निवड मंडळाचा निर्णय कार्यकारी समितीच्या मान्यतेनंतर अंतिम राहील. तसेच पुरस्कारासाठी प्रस्ताव व शिफारस करण्यासाठी यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कारासाठी स्वत: इच्छूक व्यक्ती वा त्यांच्या  संस्थेने केलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही.


विभागीय क्षेत्रातील  आमदार, खासदार, महानगरपालिका अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, आपल्या विभागातील नामांकित सहकारी व स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष, (यांनी लेटरहेडवर शिफारस करणे आवश्यक आहे) विद्यापीठाचे कुलगुरु त्याचप्रमाणे आपल्या क्षेत्रातील साहित्यिकांपैकी ज्ञानपीठ विजेते, सध्याचे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते यांना गौरव पुरस्कारासाठी योग्य व्यक्ती व संस्थांची शिफारस करुन प्रस्ताव पाठवता येईल., गौरव पुरस्कारासाठी ज्या व्यक्तींची वा संस्थेची शिफारस करावयाची त्यांची संपूर्ण माहिती खालील मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मराठीत पाठवावी., सोबत पाठव्विलेले फोटो, दाखले, लिखाण अगर इतर साहित्य परत करणे शक्य होणार नाही. परंतु त्याबाबतीत निवडमंडळाने मागिल्यास वरील कागदपत्रांच्या मुळ प्रति प्रतिष्ठानकडे सादर कराव्या लागतील. अशा मुळ प्रति गौरव पुरस्कार वितरणानंतर परत केल्या जातील., अशा शिफारशी व प्रस्ताव जाहीर केलेल्या अंतिम तारखेपूर्वी विभागीय केंद्राच्या कार्यालयात प्राप्त होेणे आवश्यक आहे.


विभागीय केंद्राचे कार्यकारिणी मंडळ व गौरव पुरस्कारासाठी निवड मंडळ म्हणून काम करील., वरील शिफारशी किंवा प्रस्तावांव्यतिरीक्त इतर योग्य व्यक्तीचा संस्था निवडण्याचा अधिकार विभागीय केंद्राच्या कार्यकारिणी मंडळास राहील. तसेच पुरस्कारासाठी मार्गदर्शक सूचना  ज्या व्यक्तीची शिफारस केली आहे त्यांचे संपूर्ण नांव, पूर्ण पत्ता, जन्म तारीख, शैक्षणिक अर्हता (थोडक्यात त्यांचा बायोडेटा) व पासपोर्ट साईजचे दोन अलिकडील फोटो व कार्याची माहिती प्रस्तावाबरोबर पाठवावेत., संस्थेची शिफारस असेल तर त्या संस्थेचे पूर्ण नांव, पत्ता, नोंदणी क्रमांक व तारीख सध्याच्या पदाधिकार्‍यांची पूर्ण नांवे व पत्ते, थोडक्यात त्या संस्थेचा परिचय व कार्याची माहिती प्रस्तावाबरोबर पाठवावेत., व्यक्ती व संस्थेच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये, त्याचे विभागीय क्षेत्राच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्व, त्याचा आजूबाजूच्या परिसरावर पडलेला प्रभाव इतरत्र अनुकरणीय असा त्या कार्यातील भाग याची माहिती घ्यावी., शिफारस केलेल्या व्यक्तीला अगर संस्थेला यापूर्वी पारितोषिके, बक्षिसे अगर मानमान्यता मिळाली असेल त्याचा संपूर्ण तपशील द्यावा., शिफारस करणाार्‍या व्यक्ती/संस्था यांचे नांव, पत्ता, टेलिफोन व संपर्कासाठी आवश्यक ती माहिती.इतर काही आवश्यक माहिती. सोबत देण्यात यावी.



पुरस्कारासाठी उल्लेखनीय कार्य करणार्‍या जिल्ह्यातील व्यक्ती व संस्थांनी तेरणा नागरी सहकारी  बँक, गोरे कॉम्पलेक्स समतानगर उस्मानाबाद या पत्त्यावर  30 सप्टेंबर 2021 पर्यंत  आपले प्रस्ताव पाठवावेत यासाठी जीवनराव गोरे 9422069930,संतोष हंबीरे 9422069650, बालाजी तांबे 9421357072 यांच्याकडे संपर्क करावा. व प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन प्रतीष्ठाणचे विभागीय अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी केले आहे.

 
Top