तामलवाडी , दि . २५ :
तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील ग्रामपंचायतच्या नूतन सरपंचपदी बालाजी दगडू शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. हि निवड प्रक्रिया बुधवार दि . 25 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली.
माजी सरपंच विजय निंबाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त झाले होते. निवडणूक विभागाच्या निर्देशनुसार हि निवड प्रक्रिया पार पडली. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी के.बी.भांगे, ग्रामसेविका एम.ए.गलांडे, तलाठी संजीवनी स्वामी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहिले. निवड प्रक्रियेनंतर नूतन सरपंच व पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच बालाजी डोंगरे, शंकर कदम, माजी उपसरपंच प्रभाकर चव्हाण, मारुती मते, ग्रामपंचायत सदस्य श्रीराम शेळके, राम शेंद्रे, शामल चव्हाण, कमलबाई जाधव, लतिका लोहार, केशरबाई शिंदे तसेच ग्रामस्थ संतोष मते, दिपक शिंदे, दयानंद शिंदे, महेश सावंत, महादेव सावंत, बाळासाहेब पंढरी डोंगरे, भास्कर मते, सदाशिव मते, शंकर गाटे, एकनाथ मते, पोलीस पाटील दादाराव मारडकर, अविनाश गाटे, सागर गाटे, लहू गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.