तुळजापूर , दि २६ :
सोलापूर व चंद्रपूर जिल्ह्यातील घडलेल्या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) तुळजापूरच्या वतीने तुळजापूर तहसील कार्यालयापूढे निदर्शने करण्यात आली.
याप्रसंगी रिपाइंच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील माळवाडी (बोरगाव) ता.माळशिरस येथे मातंग समाजातील मयत गोविंद साठे यांच्या प्रेतावर स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी जातीयवादी लोकांनी जातीवाचक शिवीगाळ करून विरोध केल्याने शेवटी ग्रामपंचायतीपुढे त्यांच्या प्रेतावर अंत्यविधी करावा लागला तर चंद्रपूर जिल्ह्यातील वणी (खुर्द)ता.जीतवी येथे जादू ठोणा अंधश्रद्धा विरोधी प्रतिबंधात्मक कायदा हातात घेवून करणी भानामती करता या कारणावरून गावातील जातियवादी लोकांनी सात मागासवर्गीय वयोवृध्द स्त्री पुरुषाना खांबाला बांधून बेदम मारहाण केली. सदर दोन्ही घटना या निंदनीय असून पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या आहेत. या दोन्ही घटणेचा रिपाइं तर्फे निषेध करण्यात येत असून दोन्ही घटनेतील आरोपींना कडक शिक्षा करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
तसेच तुळजापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नरवडे यांचे अनाधिकृत बांधकाम पाडण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
यावेळी रिपाइंचे मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आनंद पांडागळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष ,युवा आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष अरूण लोखंडे, तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के, तुळजापूर विधान सभा अध्यक्ष प्रकाश कदम ,शहराध्यक्ष अरुण कदम, युवा आघाडी शहराध्यक्ष अमोल कदम प्रा.अशोक कांबळे, राज कदम,नरेंद्र शिंदे, हणमंत सोनवने,तानाजी डावरे, संजयपारधे,चंद्रकांत डावरे, रावण सोनवने, भिमराव कदम,बापू भालेकर,विशाल सोनवने,अनिकेत सोनवणे, आभिमान नाकतोडे, चंचल कदम श्रावण कदम,विनोद भालेकर, बाळू सिरसट,सुलेमान शेख,बापू शिंदे आदी उपस्थित होते.