तुळजापूर , दि . २५
अल्पसंख्यक विभाग उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्षपदी तौफिक शेख यांची नियुक्ती अल्पसंख्यक प्रदेश अध्यक्ष मोहम्मद खान पठाण यानी केली. सदर निवडीनंतर तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
अल्पसंख्यक प्रदेश उपाध्यक्ष मसूद शैख यांनी स्वगृही तौफिक शैख यांचा सत्कार प्रदेश उपाध्यक्ष मसूद शैख, उपाध्यक्ष कदर खान, उपाध्यक्ष वाजिद पठाण, शहर अध्यक्ष अयाज बाबलू शैख, नगर सेवक खलीफा कुरेशी, यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शहर उपाध्यक्ष मकसुद शेख, तालुका कार्याध्यक्ष आरिफ बागवान, रफीक शेख यांच्या उपस्थित होते.