लोहारा , दि .२५ :
लोहारा तालुक्यातील जीर्ण शिधापत्रीका बदलुन देणे, विभक्त शिधापत्रीका देणे, तसेच शिधापत्रीकेतील नाव कमी करणे, नवीन नाव समावीष्ट करणे यासह आदी बाबत तालुका स्तरावर (दि.२५) ते (दि.२७) आगस्ट दरम्यान मोहिम राबविण्यात येत असून बुधवारी (दि.२५) लोहारा येथील भारत माता मंदिरात या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
पहिल्या दिवशी पात्र लाभार्थ्यांना नवीन, दुय्यम, शिधापत्रिका व नाव कमी करणे, वाढवणे आदींचे तहसीलदार संतोष रुईकर पुरवठा विभागाचे पेशकार बालाजी चामे यांच्या हस्ते नागरिकांना वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे सुचनेनुसार जिर्ण झालेल्या शिधापत्रीका बदलुन देणे, नाव समाविष्ट करणे व नाव कमी करणे, नवीन नावे समाविष्ट करण्यासाठी शिबीराचे आयोजन करुन लाभ देण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार लोहारा येथे पहिल्याच दिवशी नागरिकांचा या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून गुरुवारी (दि.२६) माकणी मंडळा अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांसाठी ग्रामंपचायत कार्यालय माकणी, तर
शुक्रवार (दि.२७) जेवळी मंडळा अंतर्गत सर्व गावांसाठी जेवळी ग्रामंपचायत कार्यालयात शिबीराचे आयोजन करण्यात आले असून पात्र व गरजू लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वाटप करण्यात येणार असून गरजू लाभार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार संतोष रुईकर व पुरवठा विभागाचे पेशकार बालाजी चामे यांनी केले आहे.
शिबीर यशस्वीतेसाठी अव्वल कारकून शिवलिंग येरटे, मंडळ अधिकारी श्री. बरणाळे, श्री. स्वामी, तलाठी श्री. हंगरगे, मनोज चव्हाण, दिगंबर कांबळे, आनंद राठोड, संभाजी सुरवसे, इंनुस पटेल, महेश्वरी साळुंके, यांच्यासह इतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले