तुळजापूर दि ७ :
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते तुळजापूर तालुक्यातील खोताचीवाडी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा शनिवारी संपन्न झाला.
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ ते खोताचीवाडी रस्त्याचे डांबरीकरण करणे (रु.१४ लक्ष), आमदार निधीतील लक्ष्मी मंदिरासमोरील सभामंडप (रु. ५ लक्ष), दलित वस्तीत सिमेंट काँक्रीट रस्ता (रु.०३ लक्ष) तसेच १५ व्या वित्त आयोगातून पाण्याची टाकी (रु.२ लक्ष) या कामांचे भूमिपूजन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विधिवत करण्यात आले.
तसेच एमआर ईजीएस मधून रु.१६ लक्ष खर्चून पूर्ण झालेल्या सरडेवाडी झोपडपट्टी ते गैबी पीरसाहेब पर्यंतच्या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले, या लोकार्पण झालेल्या रस्त्यांच्या कामामुळे लोकांची गैरसोय दूर होणार आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.अस्मिता कांबळे, भिवाजी इंगोले, उपसभापती दत्ता शिंदे, चित्तरंजन सरडे, विजय शिंगाडे, प्रतापसिह सरडे, शिवाजी गोरे, शरद जमदाडे, सिद्धूण्णा कोरे, राजा वडणे तसेच खोताचीवाडी, सरडेवाडी गावातील लोकप्रतिनिधी, प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ आदींची उपस्थिती होती.
आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांनी याप्रसंगी स्थानिक कार्यकर्त्यांनी विकासकामांमध्ये राजकारण न करता लोकांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांना प्राधान्य देण्यात यावे अशी सूचना त्यांनी अनौपचारिक पुढे बोलताना केली.