काटी , दि. ५

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते नागनाथ सोनवणे (आठवले) वय (50) यांचे सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान  निधन झाले. 


नागनाथ यास  काल शेतात  सर्पदंश झाल्याचे समजते. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने  सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आज पहाटे 3:30 वाजता त्यांचे उपचारा दरम्यान  निधन झाले. 
           
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी,तीन भाऊ, भावजय,जावाई, पुतणे असा परिवार आहे . त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
     

 
Top