उस्मानाबाद , दि .४
मुरुम पोलीस ठाणे : ‘स्मार्ट इंडीया प्रा. लि.’ या नेटवर्कींग स्वरुपाच्या योजनेमध्ये पैसे भरल्यास अधिक परतावा मिळेल असे आमिष कंपनीच्या संचालक मंडळातील पिंटु बजाज, ओमकार क्षिरसागर, विश्वास जाधव, अनिल कदम, अमित डांगे, श्रीनिधी शेंदुर्नीकर, सर्व रा. पुणे यांसह अन्य तीन व्यक्तींनी दाखवले होते. त्यास भुलून रमेश राठोड, रा. येणेगुर, ता. उमरगा यांसह शाम पवार, संगिता जाधव, महादेव बिराजदार यांनी त्या योजनेत सन- 2018- 19 मध्ये एकुण 22,00,000 ₹ रक्कम गुंतवणूक केली होती. परंतु संबंधीत संस्थेने त्यांना ठेवी व परतावा दिला नाही. यावरुन रमेश राठोड यांनी दि. 03 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे