उस्मानाबाद , दि . ४

बेंबळी पोलीस ठाणे : नितीन सुरवसे, वय 49 रा. काजळा हे दि. 02 ऑगस्ट रोजी 14.15 वा. कामेगाव- औसा रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 4 डीएच 3893 चालवत जात होते. दरम्यान अमोल सयाजी गांजळे, रा. आंबेगाव, जि. पुणे यांनी बोलेरो वाहन क्र. एम.एच. 14 एचयु 6923 हे निष्काळजीपने चालवून नितीन यांच्या मो.सा. ला धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय मदतीची तजवीज न करता व नजीकच्या पोलीस ठाण्यास अपघाताची खबर न देता नमूद वाहन चालक हा वाहनासह अपघात स्थळावरुन निघून गेला. यावरुन मयताचा भाऊ- अशोक सुरवसे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134, 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top