मुरुम, दि. २ :
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती समितीच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकातील सभागृहात आयोजित अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती रविवारी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष सहदेव गायकवाड, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे संस्कृतिक सभागृहाचे अध्यक्ष बबनराव बनसोडे, माजी सैनिक तुळशीराम देडे, शेषराव सरवदे, मल्लिनाथ देडे, विनायक देडे, भागुजी क्षीरसागर, रशीद शेख, राजु देडे, माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, किरण गायकवाड, पंकज बनसोडे, फकीर दलाचे तुळशीराम देडे, सुरेश बनसोडे, रघुनाथ बनसोडे, लेखन देडे, विशाल देडे, किरण कांबळे, संभाजी बनसोडे, शंकर पाटोळे, अविनाश बनसोडे, आशु बनसोडे, भोलानाथ देडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.