नळदुर्ग , दि .२३ : 

 येथे दि. 22 ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत युवक, व्यापारी तसेच छोटे मोठे उद्योग करणाऱ्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विद्यमान सदस्य नेताजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

          
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी बोलताना सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटच्या घटकाचा विचार करत युवक, छोटे मोठे उद्योग करणारे नागरिक यांचा विचार करत प्रधानमंत्री स्वनिधी योजना आणली असून यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

 नळदुर्ग शहर हे ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटन स्थळ आहे, नळदुर्ग किल्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. स्वनिधी योजनेचा लाभ घेत युवकांनी छोटे मोठे उद्योग सुरू करावेत. यावेळी जी.प चे माजी अध्यक्ष नेताजी पाटील यांनी स्वनिधी योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा, यासाठी कर्ज मेळावा आयोजित केल्यामुळे अभिनंदन केले आणि शेवटच्या घटका पर्यंत ही योजना पोहोचवत कर्ज मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे मेळाव्याच्या निमीत्ताने सांगितले. 


मेळाव्याचे आयोजन भाजपाचे उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुशांत भुमकर यानी केले होते. यावेळी भाजपा युवा मोर्च्याचे जिल्हा चिटणीस श्रमिक पोतदार, माजी पंच्यायत समिति सदस्य साहेबराव घुगे, नगरसेविका छमाबाई राठोड, नांदुरिचे सरपंच हणमंत पाटिल, धिमाजी घुगे,ओबीसी आघाडीचे सुजीत सुरवसे, पद्माकर घोड़के, विशाल डुकरे, रियाज शेख , कैलास चव्हाण, सुनील चौधरी, मुदस्सर शेख , उमेश नाईक, अबुलहसन रिझवी, एसबीई ग्राहक सेवाकेंद्र प्रमुख इमरान शेख व राहुल जाधव आदि उपस्थित होते.
 
Top