तुळजापूर दि २३ :
सहापदरी सुरत ते चेन्नई हा महत्त्वकांक्षी महामार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातून जात असल्यामुळे जिल्ह्याची विकासाची गती निश्चित वाढेल असा विश्वास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापूर येथे डी व्ही पी पीपल मल्टीस्टेट सोसायटीच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी सुरतगाव भागांमधून पुढे जात असून या रस्ते विकासामुळे उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाला खूप मोठी चालना मिळणार आहे, नगर,बार्शी, भूम, तुळजापूर मार्गे हा रस्ता पुढे जात आहे, यामुळे तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी आणि सुरतगाव या परिसरातून हा महामार्ग पुढे सोलापूर जिल्ह्यात जाणार आहे असे जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाषणातून सांगितले.
महंत तुकोजीबुवा महाराज व महंत मावजीनाथ महाराज यांच्या शुभहस्ते तुळजाभवानी देवीच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने डी व्ही पी पीपल मल्टी स्टेट को ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या शाखेचे उद्घाटन विधिवत संपन्न झाले, याप्रसंगी संत तुकोजी महाराज, मावजीनाथ महाराज, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, संस्थेचे मार्गदर्शक अभिजीत पाटील , माजी जि प अध्यक्ष धीरज पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर मगर, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख शाम पवार, नगरसेवक राहुल खपले, माजी नगरसेवक विनोद गंगणे, माजी नगरसेवक राजामामा भोसले, पुजारी मंडळ अध्यक्ष सचिन साळुंके, नगरसेवक पंडित जगदाळे, नगरसेवक सुनील रोचकरी, समर्थ नागरी बँक चेअरमन नारायण नन्नवरे, माजी नगरसेवक विशाल रोजकरी , डॉक्टर दिग्विजय कुतवळ, प्रकाशराव पाटील, हायकोर्ट विधिज्ञ गणेश पाटील, शिवाजीराव पाटील, संतोष कदम, दीपक भोसले, सुरेश पाटील दहिवडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, गोकुळ शिंदे, अमर मगर, विशाल रोचकरी यांनी मनोगत व्यक्त केले.